प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने देवगड तालुक्यात विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप

देवगड (प्रतिनिधी) : शिरवल येथील प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत देवगड तालुक्यात विद्यार्थ्यांना रेनकोट चे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा तळेबाजार व अंगणवाडी येथे प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रतिनिधी प्रशांत गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील जिल्हा परिषद मधील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटाप करण्याचा प्राणजीवन सहयोग संस्थेचा मानस आहे. त्याची सुरवात कणकवली तालुक्यातून करण्यात आली. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील मुलांना हे वाटप करायचे असून यावेळी देवगड येथील जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सदस्य मनीष परब, मिथुन लाड, ऋषीकेश धुरी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक समीर कुडाळकर, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गणेश लब्दे, उपाध्यक्ष प्रियांका म्हापसेकर, शिक्षिका मीना सरकते, स्नेहा वागंणकर, अंगणवाडी सेविका शोभा कुबडे, मदतनीस साटम, विनायक धुरी आदींच्या उपस्थितीत रेनकोट वाटप करण्यात आले.

प्राणजीवन सहयोग संस्था संस्थेने आपल्या सामाजिक कार्यातून याआधीही नागरिकांना मदत केली आहे. कोरोना काळात सिंधुदुर्गात मोफत सॅनिटायझर फवारणी तसेच रुग्णांना फळे वाटप व वाफेची मशीन वाटप करण्यात आली होती. यावर्षी प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या मार्फत राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात येत आहे.

error: Content is protected !!