DYC समन्वयक कालिदास घाटवल यांचे पब्लिक रिलेशन फाउंडेशनतर्फे सिंधुदुर्गनगरीत स्वागत
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मेरा युवा भारत सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा पंजिम चे DYC समन्वयक कालिदास घाटवल यांचे पब्लीक रिलेशन फाउंडेशनच्या वतीने सिंधुदुर्गनगरीत स्वागत करण्यात आले. यावेळी निरवडे गावचे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव तसेच पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या संस्थापक फिजा मकानदार, साथी नासिर मकानदार, साथी भाविका कदम, साथी फातिमा मकानदार आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्राध्यापिका पूनम गायकवाड व विशाल वालावलकर हेसुद्धा उपस्थित होते.
स्वागत स्वीकारल्यानंतर श्री. घाटवल यांनी सर्वांचे आभार मानत मार्गदर्शन केले. येणाऱ्या आणि चालू असलेल्या स्पर्धेच्या युगात युवकांनी आपली कौशल्य जोपासून ती ओळखून आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या माध्यमातून आपण कसं व कोणत्या प्रकारचं काम केलं पाहिजे हे सांगितलं. त्याचप्रमाणे कालिदास घाटवल यांनी फिजा मकानदार ह्यांच्या पब्लिक रिलेशन फाउंडेशन व ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव ह्यांचे देखील कौतुक केले.











