अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कुडाळ पोलीस ठाणे पुन्हा रजिस्टर नंबर 209/ 2025 NDPS कायदा कलम 8 क, 20 ब (ii) ब, 25 अन्वये गुन्ह्यात आरोपी विशाल सुरेश वाडेकर याला 1680 ग्रॅम गांजा ताब्यात बाळगल्या प्रकरणी अटक करून न्यायालयात हजर केलेले होते. तो सध्या न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये आहे. जप्त करण्यात आलेला गांजा विशाल वाडेकर याने दुसरा आरोपी केतन आनंद सुकी याने पुरवल्याची कबुली पोलिसांकडे दिली होती. कुडाळ पोलिसांनी केतन सुकी याला सुद्धा आरोपी केलेले होते. आरोपी केतन सुकी याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. तर अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश श्री झपाटे यांचे समोर होऊनआरोपीचा सदर गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी सहभाग दिसून आल्याने न्यायालयाने आरोपी केतन आनंद सुकी राहणार वेंगुर्ला याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला.











