प्रणाली मानेसह तिघांची अंतरिम अटकपूर्व जामीनाची मुदत १८ जुलै पर्यंत वाढविली 

ओरोस (प्रतिनिधी) सावंतवाडी माठेवाडा  येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या देवगड येथील संशयित आरोपी प्रणाली माने आणि आर्य माने आणि मिलिंद माने या तिघांना मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीनाची मुदत १८ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहित महिलेने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्ये प्रकरणी प्रिया चव्हाण यांच्या आई वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रिया चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील प्रथम प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मिलिंद माने यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी प्रणाली माने आणि आर्य माने तसेच मिलिंद माने यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या तिघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. आता याची मुदत १८ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.

error: Content is protected !!