सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर अपहरणप्रकरणी आरोपी अमोल शिरसाट जामिनावर मुक्त

ॲड. विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर यांचा पळवून घेऊन जाऊन घातपात केल्या प्रकरणी संशयित आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांची आज जिल्हा न्यायाधीश श्रीम. व्ही एस देशमुख यांनी जामिनावर मुक्ततेचा आदेश दिला. आरोपीच्यावतीने तर्फे ॲड. विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जामिनावर मुक्तता करण्यात आली. यासाठी ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव, ॲड. सुयश गवंडे यांनी सहकार्य केले.  

चेंदवण, नाईकनगर येथील मालती मधुकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर यांचा पळवून घेऊन जाऊन घातपात केल्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांच्या विरोधात निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यांनी जामीन मिळावा, असा जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होवून न्यायालयाने त्यांना योग्य त्या अटी-शर्तीवर व ५० हजार रुपये रक्कमेच्या जामिनावर मुक्त केले आहे.

error: Content is protected !!