शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे सुयश

विद्यालयाच्या गौरांग ढवण वैष्णवी हावळ व सिद्धेश भंडारी यांचा गुणवत्ता यादीत समावेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी गौरांग ढवण, वैष्णवी गणेश हावळ व सिद्धेश संतोष भंडारी यांचा ग्रामीण सर्वसाधारण जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये समावेश आहे. सिद्धेश भंडारी याने एन. एम. एम. एस. परिक्षेत देखील उज्वल यश संपादन करत याने शाळेची उज्वल परंपरेला कायम ठेवली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या बाह्य परिक्षा विभाग प्रमुख विभाग प्रमुख एस. व्ही. भोसले, पी. पी. सावंत, पी. बी. पवार, एम. एस. चोरगे, एस. टी. तुळसणकर, ए. जी. केळकर, जे. एस. बोडेकर, ए. एस. परिट, एस. ए. सबनिस यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्याचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गुलाबपुष्प देवून संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी गौरविले. यावेळी मुख्याध्यापक बी. एस. नादकर, बाह्य परिक्षा विभाग प्रमुख एस. व्ही. भोसले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, मार्गदर्शक सर्व शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!