चौके ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाची जिल्हा कार्यकारिणी निवड सभा कुडाळ हायस्कूल, कुडाळ या ठिकाणी संपन्न झाली. या सभेमध्ये श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट, तालुका – मालवण या प्रशालेतील प्रसाद कुबल यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड सर्वानुमते करण्यात आली. तर बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ चे धोंडी रवींद्र गावडे यांची जिल्हा कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली.
कार्यकारिणीची निवड सभेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष औदुंबर शिवदास भागवत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये कार्यकारिणी निवडीसाठी निरीक्षक म्हणून वामन गेंदाप्पा खोत यांनी काम पाहिले. या सभेत सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची 2025-2028 या कालखंडासाठी निवड करण्यात आली.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष प्रसाद हनुमान कुबल ( श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट ता. मालवण ), कार्यवाह धोंडी रवींद्र गावडे ( बॅ. नाथ पै विद्यालय, कुडाळ ), जिल्हा परीक्षा प्रमुख महेश कृष्णा चव्हाण ( स. का. पाटील विद्यामंदिर, केळूस ), सहाय्यक परीक्षा प्रमुख चाळोबा मनोहर हरगुडे ( श्री सरस्वती विद्यालय आरवली, टांक ), धनाजी शंकर भोसले ( शोभना नारायण विद्यालय, नानिवडे ), उपाध्यक्ष सुशीलकुमार पांडुरंग कडुलकर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ), रामचंद्र नामदेव भानुसे (माध्यमिक विद्यामंदिर कनेडी ), प्रसाद कृष्णा पारकर ( न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट )
सहकार्यवाह नागेश गिरजाप्पा विरकर ( भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय, चौके ), भाग्येश रामचंद्र कदम ( न्यू इंग्लिश स्कूल,फोंडाघाट ), संतोष शामराव मेथे ( कीर्ती विद्यालय, घोटगेवाडी ), महामंडळ प्रतिनिधी भाऊसाहेब शंकर चवरे ( श्री भाई साहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव ), राजाराम धोंडीबा फर्जंद ( माध्यमिक विद्यालय, सोनावल ), कुडाळ तालुकाध्यक्ष विद्यानंद अच्युत पिळणकर ( शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय, साळगाव ), कार्यवाह विलास सिताराम राठोड ( लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली ), मालवण तालुकाध्यक्ष मिलिंद चंद्रकांत शिरोडकर ( अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण ), कार्यवाह अभिजीत सुरेश धुरे ( जनता विद्यामंदिर, त्रिंबक ), सावंतवाडी तालुका अध्यक्ष दशरथ रामकृष्ण शृंगारे ( राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी ), कार्यवाह रोहन गोविंद पाटील ( कै. बाबुराव पाट्येकर माध्यमिक विद्यालय, दाणोली ), वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सविता शंकर जाधव ( रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ले ), कार्यवाह संदीप महादेव तुळसकर (श्री शिवाजी हायस्कूल, तुळस ), कणकवली तालुका अध्यक्ष संदीप वामन नागभिडकर ( विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली ), कार्यवाह सतीश बाबू तवटे ( शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव ), देवगड तालुका अध्यक्ष शिवाजी रामचंद्र ढाकणे (अनंत केळकर स्कूल, वाडा ), कार्यवाह रमेश न्हानू कविटकर ( डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट ), वैभववाडी तालुका अध्यक्ष संदीप बळवंत शिंदे ( अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी ), कार्यवाह दीपा संतोष भरडकर ( माधवराव पवार विद्यालय, कोकिसरे ), दोडामार्ग तालुकाध्यक्ष अरुण श्रीकांत सावंत ( माध्यमिक विद्यालय माटणे ),
कार्यवाह विष्णूदास भिवा नाईक ( माध्यमिक विद्यालय झरेबांबर ), जिल्हा सल्लागार माजी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष औदुंबर शिवदास भागवत ( शिवडाव माध्यमिक विद्यालय ), वामन गेंदाप्पा खोत ( भंडारी एज्यू. सोसायटी हायस्कूल मालवण ) व माजी अध्यक्ष तुकाराम सदाशिव पेडणेकर ( श्री शिवाजी विद्यामंदिर, काळसे ) या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीस महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रसाद कुबल यांची निवड












