शिवसेना पदाधिकारी उत्तम ओटवकर यांना मातृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : आयनल मनेरवाडी येथील सिताबाई बळीराम ओटवकर (७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. मनेरवाडीत प्रत्येक वेळप्रसंगी धावून जाणारी तसेच सामाजिक, धार्मिक कामात उत्साहाने सहभागी होत असे अश्या कष्टकरी महिलेच्या निधनाची बातमी समजताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तीच्या पश्चात पती, ३ मुलगे सुना, नातवंडे असा परिवार आहे. रिक्षा व्यावसायिक व शिवसेना पदाधिकारी उत्तम ओटवकर यांच्या त्या मातोश्री होत्या.

error: Content is protected !!