डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन मध्ये वेदांत क्लासेसची बाजी

प्राजक्ता मंदार अवसरे यांचे लाभले मार्गदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : माणसाच्या जडणघडणीत अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे ‘शिक्षण’. दहावी, बारावी किंवा इतरही शैक्षणिक गोष्टींत कोकण कायमच अग्रेसर असतो. 2024 – 25 या शैक्षणिक वर्षांमध्ये “ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती” यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच तालुकास्तरीय डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनेशन स्पर्धा परीक्षा राबविण्यात आली. या परीक्षेमध्ये वेदांत क्लासेस कणकवली च्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये 1) जियान डेनिसराजा नाडार (इ. 1ली, इंग्रजी माध्यम कणकवली तालुका द्वितीय विभागून), 2) गौरवी वामन नाईक (इ. 1ली, इंग्रजी माध्यम उत्तेजनार्थ), 3) पियुष प्रसाद वाळके (सेमी माध्यम इ. 2री, तृतीय), 4) भूमी प्रशांत सावंत (सेमी माध्यम इ. 3री, प्रथम विभागून) 5) पूर्वा अर्जुन धोत्रे (मराठी माध्यम इ. 8वी, प्रथम विभागून) यांनी दिमाखदार यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना वेदांत क्लासेस कणकवलीच्या मार्गदर्शिका प्राजक्ता मंदार अवसरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. विद्यार्थांनी मिळवलेल्या या यशाबद्दल समस्त पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शिका प्राजक्ता मंदार अवसरे यांचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

error: Content is protected !!