युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचे समाजभान

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्रीवाटप

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम सुरेश लोके यांनी समाजभान राखत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चाने मोफत छत्र्यावाटप केले. युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके हे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना छत्रीवाटप करतात. त्याचप्रमाणे यावर्षीही 18 जुलै रोजी उत्तम लोके यांनी दारिस्ते गावातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्र्या वाटप केले. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर, युवासेना उपशाखाप्रमुख श्रीराम गुरव, प्रशालेतील शिक्षक वृंद, लवू पवार, सुरेश लोके , अंगुली जाधव, संदीप गांवकर, मदन बागवे , दिलीप लोके, ओमकार गावकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!