पीएम श्री श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरेच्या विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा आनंद

वैभववाडी (प्रतिनिधी) : पीएम श्री श्री महालक्ष्मी विद्यामंदिर, कोकिसरे या शाळेचा निसर्ग, पर्यावरण, शेती व शेतकरी यांच्याशी नाळ जोडणारा ‘बांधावरची शाळा’ हा  उपक्रमाचा विद्यार्थांनी आनंद घेतला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन औत धरणे, तरवा काढणे, लावणी करणे, बांध घालणे अशी विविध शेतीची कामे केली. विद्यार्थ्यांनी चिखलात खेळण्याचा, मातीशी नातं जोडण्याचा आणि काम करण्याचा मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शेती व शेतकरी जीवनाविषयी आत्मीयता निर्माण होण्यास मदत झाली. अशा प्रकारच्या अनुभवातून शिक्षणप्रक्रिया अधिक सजीव व प्रभावी होते.    

यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य राजेंद्र कांबळे,शिक्षण विस्तार अधिकारी तथा गटसमन्वयक रुचिता कदम, केंद्र प्रमुख नितीन कदम, विभागीय समन्वयक ग्यानप्रकाश फाउंडेशन प्रशांत भोसले,  विषयतज्ज्ञ सरिता जाधव, स्नेहल रावराणे, तानाजी कांबळे, वैदेही पिळणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बडमे, उपाध्यक्ष आरुषी काजरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव, शिक्षक अमोल येनगे, गजानन टक्के, जयवंत मोरे, गीता टक्के, आकांक्षा जाधव, गौरेश पालकर, अमोल सुतार, अंगणवाडी सेविका वैष्णवी जठार, अनिता कुडाळकर, पालक व ग्रामस्थ आदींनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!