कुडाळ (प्रतिनिधी) : नगरपंचायत नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या आईचे काल पहाटे दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य बंदर व मत्स्य विकास कॅबिनेट मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांत्वन भेट देत नगरसेवक मांजरेकर यांची भेट घेतली. यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, मोहन सावंत, बंड्या सावंत, निलेश परब, रुपेश कानडे, सुनील बांदेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मांजरेकर कुटुंबियांचे पालकमंत्री राणेंनी केले सांत्वन










