चौके सम्यकनगर येथील घटना
चौके (प्रतिनिधी) : संततधार पडणाऱ्या पावसाने बुधवार दिनांक 23 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चौके सम्यक नगर येथील सुनील अंकुश चौकेकर यांच्या बंद घराची भिंत व छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. याबाबत चौके सरपंच पी. के. चौकेकर यांनी चौके तलाठी आणि पोलीस पाटील यांना कल्पना देऊन नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. घराची भिंत आणि छप्पर कोसळल्याने घराचे सुमारे 35000 चे नुकसान झाले असून सदर नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी होत आहे.













