आमच्या नेत्यांवर टीका करण्यासाठी उबाठाला ठकसेनाला पुढे करावं लागतं हे दुर्दैव – सर्वेश दळवी

उत्तम लोके हे नाईकांचे पायचाटे

सेन्टरिंग वाल्याचे पैसे दिले नाही म्हणून आपल्या च कार्यालयात मार खाणारे उत्तम लोके यांनी पत्रकार परिषद घेताना विचार करावा

कणकवली (प्रतिनिधी) : मंत्री नितेश राणे व युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदिप मेस्त्री यांचा काम उत्तम लोके यांच्या सारख्या भुरट्यांना कळणार नाही, गुंडांची शिवसेना, भगवी टोळी अशा पद्धतीचे शिवसेनेवर टीका करणाऱ्या नाईकांनी त्याच शिवसेनेत प्रवेश करून स्वतः निष्ठावान कसे हे सांगत आहेत. काँग्रेसला मुठ माती देऊन स्वार्थासाठी आणि सध्या व्यवसाय अबाधित ठेवण्यासाठी शिवसेनेत गेलेल्या सुशांत नाईक यांनी स्वतः भाऊ माजी आमदार वैभव नाईक याला पाडण्यासाठी काय व्युवरचना आखली हे सांगण्याची वेळ आमच्यावर आणू नये. वैभव नाईक यांनी कणकवली विधानसभेत स्वतःचा भाऊ सुशांत नाईक याला विधानसभा तिकीट देऊ नका असे वरिष्ठांना सांगून विरोध केला. सुशांत नाईकचे तिकीट कापले म्हणून त्या रागाने सुशांत नाईक याने वैभव नाईक यांच्या विरोधात घरात बसविण्याचा करेक्ट कार्यक्रम केला. अशा नाईकांबद्दल जे कोणाचे झाले नाहीत अशा नाईकांबद्दल लोके यांना लवकरच अनुभव येईल. लोके यांना रेस्ट हाऊस येथे मारहाण झाली कणकवली व कनेडी, फोंडा येथे मारहाण झाली तेव्हा नाईक किती वेळ धाऊन आले यापुढे त्याचा त्यांना अनुभव येईल. उत्तम लोके यांनी दुसऱ्या ना व्यवसायाचे सल्ले देताना आपण कोणता व्यवसाय करत घर बांधले हे जाहीर करा, हेरा फेरी करत आपण बांधलेल्या नवीन घरातील किचन ट्रोलीला पण देणेकाराच्या नावाची पाटी लावावी लागेल आपण लोकांची घरे बांधण्यासाठी पैसे घेऊन फरार आहात. कलमठ मधील अनेक जणांचे देणेकरी असलेले लोके आपल्याला आपल्या कार्यालयात सेंट्रिंगचे पैसे देण्यासाठी आलेल्यांनी मारहाण झालेली विसरलात काय? आपण ठकसेन म्हणून प्रसिद्ध आहात म्हणून अनेक जणांनी पैसे घेऊन गेले. अनेक चेक बाउंस आतापर्यंत किती झाले ते मोजायला एक माणूस ठेवावा लागेल. लवकरच यादी प्रसिद्ध करावी लागेल आपण विरार पूर्व नायगाव चंद्रपाडा येथे आपण ८ दिवस तरी पुनः जाऊन दाखवाल का? दुसऱ्याच्या घरचे पाट्या लावताना तुमचे उधारीचे बोर्ड लागणार नाही याची काळजी घ्या, फक्त नाईकांचे तळवे चाटत पद मिळवले, यापुढे पुनः टीका केलात तर अजून उरलेली प्रकरणे जाहीर करू हे लोके यांनी लक्षात ठेवावे.

error: Content is protected !!