संतोष जुवाटकर यांच्या सौजन्याने लावण्यात २०० व्हॅटचा एल ई डी लॅम्प
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचशील नगर येथील रहिवासी संतोष शंकर जुवाटकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत खारेपाटण एस. टी. बसस्थानक परिसरातील विद्युत पोलवर लावण्यासाठी सुमारे २०० व्हॅटचा एलईडी लॅम्प ग्रामपंचायतीला भेट म्हणून दिला. नुकताच हा लॅम्प खारेपाटण एस. टी. बसस्थानक येथे लावण्यात आला. यामुळे संपूर्ण एस. टी. बस स्थानक परिसर प्रकाशमय झाले.
संतोष जुवाटकर हे खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी कर्मचारी असून सद्या ते आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये सेवेत कार्यरत आहेत. शुक्रवार दि. १ ऑगस्ट, २०२५ रोजी श्री जुवाटकर यांनी सुमारे ५००० रुपये किमतीचा सदर एलईडी विद्युत लॅम्प खारेपाटण येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रा. पं. सदस्य विजय देसाई यांचेकडे सुपूर्द केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, नाना कोळसुलकर, संकेत शेट्ये, महेश कोळसुलकर, संकेत लोकरे, गणेश कारेकर, अजय भडाळे, विलास घाडी, श्री. कल्याणकर आदी प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
संतोष जुवाटकर यांचे खारेपाटण ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तर एम. एस. ई. बी. चे वायरमन अनिकेत जाधव यांनी विद्युत लॅम्प पोलवर लावून देण्यास सहकार्य केल्याबद्दल त्याचे देखील आभार व्यक्त करण्यात आले.












