मकरंद साळकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा…!

वाढदिवसाचे औचित्य साधून वायंगणी हायस्कूल येथे वह्यांचे वाटप

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या प्रशालेचे माजी विद्यार्थी, मुलुंड विधानसभा संघटक, मुलुंडचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष मकरंद साळकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या ज्ञान दिप विद्या मंदिर वायंगणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आपला बंधू साईप्रसाद साळकर व मित्रमंडळ यांच्यावतीने संपन्न केला.

यावेळी साईप्रसाद साळकर, गुरुनाथ वायंगणकर, अमित पवार, सौरभ सावंत, नवनीत राणे, गुंजन राणे उपस्थित होते. प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. टकले यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले तर आभार केतकी बावकर यांनी मानले.

error: Content is protected !!