भाजप तालुका मालवण तालुका चिटणीस पदी दिपक सुर्वे तर हिमाली अमरे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड

उद्योजक प्रकाश मेस्त्री, स्वरा पालकर, अजित साटम, विनोद लब्दे यांची तालुका कार्यकारिणीवर निवड

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुका भारतीय जनता पार्टी कार्यकारीणीची बैठक मालवण येथे गुरुवार 31 जुलै रोजी मालवण येथे संपन्न झाली. या बैठकीत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहिर केल्या.

चिंदर गावचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिपक भागोजी सुर्वे यांना मालवण तालुका चिटणीस पदी तर मालवण पंचायत समिती माजी सभापती हिमाली सिताराम अमरे यांची भारतीय जनता पार्टी मालवण तालुका उपाध्यक्ष पदी तसेच उद्योजक प्रकाश मेस्त्री, चिंदर विद्यमान सरपंच स्वरा पालकर, अजित साटम आणि विनोद लब्दे यांची तालुका कार्यकारिणीवर निवड जाहीर करण्यात आली आहे.

error: Content is protected !!