खारेपाटण येथे महसूल विभागाच्या वतीने छ.शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत शासकीय दाखल्यांचे लाभार्थ्यांना वितरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने महसूल सप्ताहनिमित्त तहसीलदार कार्यलय कणकवली यांच्याअंतर्गत येणाऱ्या खारेपाटण मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने महसुली सप्ताह अंतर्गत ‘छ.शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ कार्यक्रम आज ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे सरपंच प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी खारेपाटण पंचक्रोशीतील लाभार्थी नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला कुरंगवणे सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे, पत्रकार व सामजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, खारेपाटण मंडळ अधिकारी सरिता बावलेकर, खारेपाटण तलाठी प्रवीण लुबडे, खारेपाटण प्रभारी ग्रामविकास अधिकारी गिरीश धुमाळे, नडगिवे तलाठी विकास चाळके, शेर्पे तलाठी अनघा अग्निहोत्री, खारेपाटण सहा. कृषी अधिकारी सागर चव्हाण, वारगाव व कुरंगवणे गाव कृषी अधिकारी सौरभ बसापुरे, खारेपाटण पोलीस पाटील अनिकेत चव्हाण, चिंचवली पो. पाटील दिगंबर भालेकर, कुरंगवणे पो. पाटील देवेन गोसावी, वायंगणी पो. पाटील निलेश कदम, वारगाव पो. पाटील दिलीप नावळे, नडगिवे पो. पाटील जितेंद्र मण्यार तसेच खारेपाटण महा ई सेवा केंद्राचे संचालक भूषण कांबळे, ऋषिकेश राऊत, कोतवाल प्रथमेश गुरसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंडळ अधिकारी श्रीम. बावलेकर यांनी महसूल विभागाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर ‘महसूल विभागाने राबविलेला हा उपक्रम अतिशय सुंदर आणि चांगला असून नागरिक तथा लाभार्थ्यांना थेट त्यांच्या गावातच विविध शासकिय दाखले उपलब्ध होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुशासनाचा व महाराजांच्या कार्याचा केलेला हा एक प्रकारे सन्मान असल्याचे भावपूर्ण उद्गार खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. यावेळी कुरंगवणे – बेर्ले सरपंच संतोष ब्रम्हदंडे, खारेपाटण मंडळ अधिकारी श्रीम. बावलेकर, खारेपाटण तलाठी प्रवीण लुडबे, प्रा. शिक्षक श्री. गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी महसूल विभागाच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून खारेपाटण मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने पंचक्रोशीतील नवनिर्वाचित पोलीस पाटील यांना विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. खारेपाटण तलाठी प्रवीण लुडबे यांनी पोलीस पाटील यांची कर्तव्ये व जबाबदारी तसेच महसूल दप्तरी कमकाजाविषयी सखोल माहिती दिली. यावेळी बहुसंख्येने पोलीस पाटील उपस्थित होते. तर या महसूल सप्ताहनिमित्त विविध शासकीय लाभार्थ्यांचा सन्मान करून विविध दाखले सन्मानपूर्वक उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!