सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटना यांची कुडाळ नवीन डेपो येथे आगार प्रमुखांच्या कार्यालयाला धडक

कुडाळ आचरा देवगड एसटी अनियमित असेल तर माझ्याशी गाठ- संदेश उर्फ गोट्या सावंत

आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ आचरा देवगड एसटी अनियमित असल्या बाबत अनेक तक्रारी असतानाही आपण या बाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ एसटी सुरू असून ती पालकमंत्र्यांच्या मतदार संघात जाते याचे भान ठेवा. एस् टी अनियमित आहे असे समजल्यास माझ्याशी गाठ आहे असा सल्ला शक्ति संघर्ष समिती विभाग अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी कुडाळ आगार प्रमुख रोहित नाईक यांना दिला.

एसटी वाहक हा ऑन ड्युटी असतानाच त्याची ड्युटी संपायच्या आधीच त्याच्या दुसऱ्या गाडीचे शेड्युल लावले जाते. नियमानुसार एसटी वाहकाला आराम देणे गरजेचे आहे मात्र तसे न होता त्या वाहकाला कंटिन्यू ड्युटी लागत आहे. संघटना पदाधिकाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार केला असता त्या पत्रांना केराची टोपली दाखवली जाते. स्वतःची सीएनजी स्टेशन नसल्यामुळे सीएनजी भरण्यासाठी झाराप इतक्या लांब कुडाळातून जावे लागते. या सीएनजी बसेस मुळे गणेश चतुर्थी मध्ये प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या लागणाऱ्या ड्युटी ह्या वेळेत लागाव्यात व त्यांनी त्या लागलेल्या वेळेतच कामे करावी. वेगवेगळ्या ड्युटीला सामान्य कर्मचाऱ्याला वेठीस धरले जाते. वाहतूक नियंत्रक मोर्ये यांच्या कामात केली जाणारी ढवळाढवळ योग्य नाही. काही कर्मचारी यांना खुश ठेवायचे आणि काही कर्मचारी यांना त्रास द्यायचे असे या आगाराचे व्यवस्थापन, आगार प्रमुख यांचे व्यवस्थापन झाले फेल. गाड्यांचा नियमित पणा नाही यामुळे प्रवासी व कर्मचारी यांचे हाल असेही संदेश उर्फ गोट्या सावंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कर्मचारी यांचे होणारे हाल तत्काळ थांबले पाहिजे. सर्व काम नियमित व सुरळीत झाले पाहिजे. चुकीला चूक म्हणायला शिका कोणाच्या चुकीला माफी नको मग कुणीही कोणत्याही संघटनेचा असो त्याला शिक्षा करा. गाड्यांचे नियमित सुटणे व कर्मचारी यांच्या वर झालेला अन्याय थांबला नाही तर 18 ऑगस्ट ला आपले सत्कार नक्कीच होईल.

यावेळी जयेश चिंचळकर, रुपेश कानडे, सुनील बांदेकर, निलेश तेंडूलकर, अशोक बागवे, विवेक परब, सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!