विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी करावा – पो. हेड कॉन्स्टे. श्रीधर शिवगण !

फोंडाघाट ग्रीन व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये प्रेरणादायी उपक्रमांचा जल्लोष !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मदर जॉय एज्युकेशन सर्विस अँड स्कूल मॅनेजमेंट, मुंबई संचलित फोंडाघाट येथील ग्रीन व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिनापासून गणेशोत्सव प्रारंभ पर्यंत, विविध सांस्कृतिक स्पर्धात्मक आणि प्रबोधन मार्गदर्शनाचे उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये स्वातंत्रोत्सव, देशभक्तीपर गीत सादरीकरण, नृत्य, वक्तृत्व नाटिका, वस्त्रहार प्रात्यक्षिक, डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा व पारितोषिक वितरण, गोपाळकाला आणि माती पासून गणपती निर्मिती इत्यादी कार्यक्रम सादर झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे फोंडाघाटचे हेड कॉन्स्टेबल श्रीधर शिवगण, कॉन्स्टेबल माने, कांबळेसर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचे हस्ते तालुका टॅलेंट सर्च मध्ये अर्जुन पाटकर,संचित चव्हाण यांना बक्षीस विभागून देण्यात आले. सांस्कृतिक विभागात भाविका गुरव, रुतवा लाड,आराध्या बागवे, आर्वी चव्हाण, संचित चव्हाण, अर्जुन पाटकर, भविष्य परब, आर्यन गुरव, रुतवा लाड यांनी सहभाग घेऊन उपस्थितांची मने जिंकली. गोपाळकाल्याचा आनंद मुलांनी लूटला. कापसापासून वस्त्रहार, मातीपासून गणेश मूर्ती यामध्येही मुलांनी आपले कसब दाखविले. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करावा असे मार्गदर्शन पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीधर शिवगण यांनी केले.

या उपक्रमांना शिक्षकवर्ग दूर्वा पाटकर, प्राची पारकर, काव्या गुरव, पूजा लाड, क्रांती जाधव, कर्मचारी महेश जाधव, अजित जाधव यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन दुर्वा पाटकर यांनी केले.

error: Content is protected !!