सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करायला मिळणे म्हणजे आमचे भाग्यच- नीलेश ठाकूर

जि. प प्राथमिक शाळा कासार्डे तांबळवाडी येथे सुवर्ण महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा

तळेरे (प्रतिनिधी) : जि. प. प्राथमिक शाळा कासार्डे तांबळवाडी येथे सुवर्ण महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा आज दि. ३० ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. उपस्थित माजी विद्यार्थ्याचे शाळेच्या सहा.शिक्षिका निकिता ठाकूर यांनी औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित माजी विद्यार्थ्याच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत पाताडे, मुख्याध्यापक नीलेश ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुनाथ पाताडे, उपसरपंच गणेश पाताडे, संजय सावंत, विजय पाताडे, शेखर तर्फे, प्रल्हाद पाताडे, नारायण पाताडे, कृष्णा पाताडे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माजी विद्यार्थ्यामध्ये शेखर तर्फे, संजय सावंत, विजय पाताडे, गणेश पाताडे, रमाकांत पाताडे, प्रल्हाद पाताडे, सुनील आईर, निलेश पाताडे, संतोष पाताडे, चंद्रकांत इंदुलकर, नारायण पाताडे यांनी मनोगत व्यक्त केले.

सुवर्ण महोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे व्हावे यासाठी विविध मुद्यावर चर्चा करून शाळेच्या व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला तसेच सुवर्ण महोत्सवी स्थानिक व उपसमिती मुंबई अशा दोन समित्या सर्वाच्यामते स्थापन करण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या प्रसंगी तांबळवाडी व तर्फेवाडीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नीलेश ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा.विनायक पाताडे यांनी मांडले.

error: Content is protected !!