बाप्पाची मनोभावे केली आरती
कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देवगड तालुक्यातील कुणकवण येथील आपल्या मूळ गावातील घरच्या गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. शनिवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी भाजपा नेते तावडे हे कुणकवण येथील आपल्या मूळ घरी दाखल झाले. आपल्या घरच्या गणपतीचे सपत्नीक दर्शन घेत बाप्पाच्या चरणी तावडे दाम्पत्य नतमस्तक झाले. बाप्पाची मनोभावे आरती केली यावेळी उद्योजक हरेश जनक, कुणकवण सरपंच जितेंद्र कदम, पोलीस पाटील छोटू राणे, विनोद तावडे यांचे बंधू विलास तावडे, रमेश तावडे, माजी सरपंच मनोहर सावंत आदी उपस्थित होते.










