नांदगावात गोवा बनावटीची दारू एलसीबी कडून जप्त

सुरेंद्र उर्फ पपी वायंगणकर सह अन्य एकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव तिठयावर ब्रिजखालील स्टॉल मध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेली 12 हजार 100 रुपये किमतीची गोवा बनावटीची अवैध दारू एलसीबी च्या पथकाने जप्त केली आहे. याबाबत सुरेंद्र उर्फ पपी वायंगणकर सह अवधूत वाळके या दोघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार रविवार 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई एलसीबी पीएसआय आर. बी. शेळके यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे,आशिष गंगावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पपी वायंगणकर हा नांदगाव तिठा येथे अवैध दारूविक्री करत असल्याची खबर एलसीबी ला होती. त्यानुसार आज त्याच्या स्टॉलवर धाड टाकली असता गोवा बनावटीची मॅकडॉल, रॉयल स्टेज, रॉयल चॅलेंज, बॉब लेमन आदी अवैध दारूसाठा आढळून आला. सदर अवैध दारू जप्त करण्यात आली असून याबाबत हवालदार ज्ञानेश्वर तवटे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वायंगणकर, वाळके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!