वैभववाडी (प्रतिनिधी) : कोळपे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बाबालाल लांजेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकतीच कोळपे ग्रामपंचायत ग्रामसभा पार पडली या सभेत त्यांची निवड करण्यात आली. या समितीत सरपंच सुनील कांबळे उपसरपंच विलास माने, हुसेन लांजेकर,आखारी ठाणगे, समीर चोचे, अमित लांजेकर,नासीर नंदकर,अमित नाचरे,मजिद नंदकर, नासिर लांजेकर,श्री ठाणगे,शबाना राऊत, रजिया ठाणगे, श्री थोडगे,ग्रामसेवक श्री चव्हाण तसेच सचिव म्हणून पोलीस पाटील आदित्य कांबळे यांची व इतर तंटामुक्त समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. नवीन तंटामुक्ती अध्यक्ष श्री लांजेकर व सर्व सदस्यांचे माजी सरपंच लांजेकर यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या
कोळपे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बाबालाल लांजेकर…












