वैभववाडी (प्रतिनिधी) : सोनाळी गाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सचिन बळीराम तळेकर यांची फेरनिवड झाली आहे. गावची ग्रामसभा नुकतीच पार पडली. यावेळी त्यांची निवड झाली. यावेळी सरपंच भीमराव भोसले, माजी सभापती अरविंद रावराणे, पोलीस पाटील राजेंद्र राणे, ग्रामसेवक श्री. बेळेकर, संतोष शेलार, संजय शिंदे, भाई रावराणे, सचिन भोसले आदी उपस्थित होते. सचिन तळेकर यांनी ग्रा. पं. सदस्य पदावर काम केले आहे. जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना उपाध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. गावातील तंटे तडजोडीने मिटवण्यासाठी त्यांनी यापूर्वी देखील प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
सोनाळी गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सचिन तळेकर यांची निवड












