खारेपाटण येथे गौरी गणपती चे ढोल ताशांच्या गजरात थाटात विसर्जन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात आज मंगळवार दिवशी सायंकाळी घरघुती गौरी गणपती मूर्तीचे विसर्जन गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर अशा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांची अतिषबाजी व गुलालाची उधळण करीत मोठ्या भक्तीभावाने भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

गणपती विसर्जनवेळी पावसाने थोडा उसंत घेतल्यामुळे विसर्जन मिरवणूकीत अबाल वृद्धासह युवक – युवती पुरुष – महिलांनी सहभाग आनंदाने सहभाग घेतला होता. गेले सात दिवस घराघरात गणपती बाप्पांच्या आगमनामुळे घराघरात मंगलमय व भक्तीमय, आनंदी वातावरण तयार झाले होते. मंगळवारी सातव्या दिवशी दुपारनंतर गावात प्रत्येक वाड्या वस्त्या तून गणपती विसर्जन मिरवणूका खारेपाटण बाजारपेठ मधून काढण्यात आल्या. यामध्ये वाजता गाजत या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खारेपाटण घोडेपाथर बंदर येथील शुक नदी येथे काठावर गणपती बाप्पांची आरती व सामुदायिक पुजा,अर्चा करण्यात आली. तर आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी बाप्पाला नवस बोलण्यात आले. त्यानंतर अतिशय जड अंतकरणाने गणपती बाप्पा मोऱ्या! पुढच्या वर्षी लवकर या!! असा जयघोष करीत गौरी गणपती विसर्जन करण्यात आले. यावेळी स्थानिक ग्रामपंचायतीचे कर्मचारी व स्थानिक पोलिस प्रशासन गणपती विसर्जन मिरवणूक सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज होते.

error: Content is protected !!