वैभववाडी थाटात गौरी गणपती विसर्जन

वैभववाडी (प्रतिनिधी) : गणपती बाप्पा मोरया !! मंगल मूर्ती मोरया!! गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर अशा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांची अतिषबाजी, गुलालाची उधळण करीत मोठ्या भक्तीभावाने गौरी गणपतींचे विसर्जन मोठया उत्सहात, भक्तिमय वातावरणात करण्यात आले. गणपती विसर्जनवेळी पावसाने उघडीप दिल्यामुळे विसर्जन मिरवणूकीत अबाल वृद्धानी सहभाग घेतला होता. गेले सात दिवस घराघरात गणपती बाप्पांच्या आगमनामुळे घराघरात मंगलमय व भक्तीमय, आनंदी वातावरण तयार झाले होते. मंगळवारी सातव्या दिवशी दुपारनंतर गावागावात गणपती विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या.यामध्ये वाजता गाजत या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणेश घाटावर गणपती बाप्पांची आरती व सामुदायिक पुजा, अर्चा करण्यात आली. तर आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी बाप्पाला नवस बोलण्यात आले. त्यानंतर अतिशय जड अंतकरणाने गणपती बाप्पा मोऱ्या! पुढच्या वर्षी लवकर या!! असा जयघोष करीत गौरी गणपती विसर्जन करण्यात आले.

error: Content is protected !!