संदेश पारकरांचे समर्थक प्रसाद अंधारींचा बर्थडे समीर नलावडेंकडून साजरा

समीर नलावडेंच्या घरी केक कापून बर्थडे साजरा

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे कट्टर समर्थक ,कणकवली नगरपंचायतचे माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांचा वाढदिवस भाजपाचे कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शनिवार 13 सप्टेंबर रोजी केक कापून साजरा केला. माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या घरी केक कापण्यात आला. प्रसाद अंधारी हे शिवसेना उबाठा चे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे कट्टर समर्थक आहेत. कणकवली नगरपंचायत च्या मागील निवडणुकीत संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यात काटे की टक्कर होऊन समीर नलावडे यांच्याकडून संदेश पारकर पराभूत झाले होते. कणकवली नगरपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यात होऊ घातली आहे.त्या पार्श्वभूमीवर संदेश पारकर यांचे कट्टर विरोधक असलेल्या समीर नलावडे यांच्या घरी प्रसाद अंधारी यांच्या उपस्थितीत अंधारी यांच्या बर्थडे चा केक कापून समीर नलावडे हे स्वतःच्या हाताने प्रसाद अंधारी यांना केक भरवतानाचा फोटो सध्या कणकवली शहरात जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे येत्या नगरपंचायत निवडणूकीत कणकवली बाजारपेठे मतदारसंघात धक्कादायक राजकीय बेरजेचे समीकरण सुरू झाल्याची चर्चा सध्या कणकवली शहरात सुरू झाली आहे.

error: Content is protected !!