कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५-२६ अंतर्गत, कणकवली तालुकास्तरीय स्पर्धा, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. “मानवी कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” यातील उपविषय ‘Mobia’ The Start of End या विषया अंतर्गत कु.स्वरा प्रकाश मेस्त्री, कु.आर्या प्रदीप सावंत, लौकिक लक्ष्मीकांत वाळके, गौरांग अरविंद सावंत, चैतन्य अरविंद शिरसाट, सोहम विनायक गावडे, मयुरेश प्रवीण कांदळकर, कु.स्वरा ठाकुर यांनी सामूहिक विज्ञान नाटिका सादर केली.या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे शिक्षक दयानंद कसालकर, साधना न्हिवेकर व मंदार मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले.
या सर्वे विद्यार्थ्यांच्या सुयशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत तसेच सर्व संस्था, शालेय समिती पदाधिकारी,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.










