विठ्ठलादेवी गाव म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विजय नारकर यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विठ्ठलादेवी या गावच्या म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी गावातील ज्येष्ठ नागरिक विजय महादेव नारकर यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली.

विठ्ठलादेवी गावच्या सरपंच ज्योती प्रदीप नारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या सभेत विजय नारकर यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच गणेश मोहन नारकर, माजी सरपंच दिनेश शांताराम नारकर, ग्रा.पं.सदस्य शांताराम नारकर,माजी उपसरपंच विजयकुमार नारकर, पोलीस पाटील स्वप्नील नारकर, ग्रामपंचायत अधिकारी विवेक नर,महेश (बंडया) नारकर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय नारकर यांचा सरपंच ज्योती नारकर यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!