हरकुळ बुद्रुक मध्ये दुचाकींचा अपघात: युवक गंभीर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कनेडी मार्गावर हरकुळ बुद्रक काळेथरवाडी येथे सोमवारी सायंकाळी 7:30 वा.च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये जोरदार अपघात झाला.कनेडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात मागील दुचाकी चालवत असलेल्या युवक गंभीरित्या जखमी झाला.त्याला तातडीने उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुढे असलेल्या दुजाकीच्या समोर कुत्रा आल्याने त्याने आपली दुचाकी काहीशी बाजूला घेतली. याचवेळी मागून येत असलेल्या दुसऱ्या दुचाकी स्वराने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की पुढे असलेली दुचाकी रस्त्याबाहेर फेकली गेली तर मागील दुचाकी रस्त्यावरून फरफटत गेल्याने त्या चालकाच्या डोक्याला गंभीर इजा पोचली.अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक येथे धावत पोहोचले त्यानंतर कनेडी येथून युवा संदेश प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेला तातडीने बोलविण्यात आले. रुग्णवाहिकेतून त्या जखमी युवकाला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीरित्या जखमी असलेला युवक हा नाटक मोहोळ येथील राहुल गावकर असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले तर पुढे चालवत असलेला दुचाकी स्वार हा दारिस्ते गावातील असल्याचे समजते.

error: Content is protected !!