कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती जाधवला सुवर्णपदक

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर असो. ऑफ कोल्हापूर, जय किसान तरुण मंडळ वडणगे यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेची विद्यार्थीनी कु.प्रज्योती जाधव हिने विभागीय तायक्वांदो स्पर्धेत अंडर १९ गटात ५९ ते ६३ किलो वजनी गटात विभाग स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे. तीची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली असून तीच्या या सुवर्णमय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत तसेच सर्व संस्था, शालेय समिती पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक बयाजी बुराण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींनी तीचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!