माजी खासदार विनायक राऊत यांनी खवळे महागणपती चे घेतले दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : माजी खासदार विनायक राऊत यांनी आज देवगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या घरी २१ दिवस विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी ३२५ वर्षाची परंपरा असणाऱ्या देवगड तालुक्यातील मानाच्या खवळे महागणपतीचे देखील दर्शन यावेळी घेतले. यावेळी खवळे कुटुंबियांच्या वतीने माजी खासदार विनायक राऊत यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर, बाळा कनेरकर आदी शिवसैनिक व खवळे कुटुंबीय उपस्थित होते.

error: Content is protected !!