ईनामदार श्री देव रामेश्वर मंदिर येथे आज दशावतार नाट्य प्रयोग

उद्योजक तथा चिंदर माजी सरपंच संतोष कोदे यांच्या वतीने पुरस्कृत

गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ हळवल यांचा “सवतीचं प्रेम” नावाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार सादर

कोकणचा बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण विशेष आकर्षण

आचरा (प्रतिनिधी) : ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे येथे ३९ दिवसाचा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. त्या निमित्त आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी श्री रामेश्वर मंदिर आचरा येथे उद्योजक तथा चिंदर गावचे माजी सरपंच संतोष कोदे पुरस्कृत, गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ कणकवली-हळवल यांचा “सवतीचं प्रेम” नावाचा दशावतार नाट्य प्रयोग रात्री ९ वाजता होणार आहे. या नाट्यप्रयोगाचे विशेष आकर्षण कोकणचा बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण असून नाट्य रसिकांनी नाट्य प्रयोगाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!