आरोपी तर्फे ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : 3 मार्च 2020 रोजी आरोपी मारुती तुकाराम कतुरे राहणार कोल्हापुर याने आपल्या ताब्यातील टाटा ट्रक क्रमांक MH09 C8179 महादेवाचा माळ या ठिकाणी ऊसतोडणी चालू असताना हयगयीने व अविचाराने चालवल्याने ऊस तोडणी कामगाराच्या मुलीला ठोकर देत अपघात करून तिला गंभीर दुखापत करून तिचे मृत्यूस कारणीभूत झाल्यामुळे फिर्यादी त्र्यंबक गंगाराम चिरमाडी राहणार परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभववाडी पोलीस स्टेशन येथे भा. द. वि. कलम ३०४(अ), २७९ व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
केसचे कामी सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जबाबातील तफावत व सबळ पुराव्याअभावी तसेच आरोपीचे वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानत कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. लटूरिया यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.












