सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :-
बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:40 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी 2:30 वाजता राष्ट्रनेता व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (17 सप्टेंबर 2025) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 ऑक्टोबर 2025) या कालावधीत ‘सेवा पंधरवडा 2025’ या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग), दुपारी 3:00 वाजता SNSP स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमेच्या शुभारंभास उपस्थिती (स्थळ : उपजिल्हा रुग्णालय कणकवली), दुपारी 4:00 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ (स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, लोरे नं. १, तालुका कणकवली), दुपारी 4:30 वाजता नवीन कुर्ली पुनर्वसन समस्यांबाबत चर्चा व बैठक (स्थळ : कुर्ली, तालुका कणकवली), सायंकाळी 6:00 वाजता तळेरे ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 संदर्भात आढावा बैठक (स्थळ : कणकवली शासकीय विश्रामगृह), सायंकाळी 6:30 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : कणकवली शासकीय विश्रामगृह), सायंकाळी 7:00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : कणकवली शासकीय विश्रामगृह कणकवली).












