युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचा आरोप
देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाडा ब्राह्मणवाडी येथे पर्पल मॅंगो होम स्टे या ठिकाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात सुमारे 1.17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात सर्व आरोपी हे भाजप सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून, काही आरोपी भाजप च्या तालुका कार्यकारणीत देखील आहेत.
स्थानिक प्रशासन या कारवाईत केवळ दिखाऊ कृती करत असल्याची जोरदार चर्चा आहे. आरोपींमध्ये काहींचे थेट संबंध भाजपशी आहेत, असे स्थानिक जनतेतून आवाज उठवला जात आहे.कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे भाजप राज है ये.पालकमंत्री नितेश राणे काळेधंदे अजिबात चालू देणार नाहीत असे वारंवार म्हणतात पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले तर चालतील अस त्यांचं म्हणणं आहे का? असा सवाल यावेळी युवासेना देवगड तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी केला.











