शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या मागणीला यश
खारेपाटण कॉलेज मध्ये आता १२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार
खारेपाटण (प्रतिनिधी) : सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वत्र इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन प्रक्रियेमुळे घोळ निर्माण झाल्यामुळे बऱ्याच खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळ्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागणार होते.ही बाब कणकवली शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या लक्षात येताच त्यांनी उपसंचालक शिक्षण विभाग कोल्हापूर यांची तातडीने भेट घेऊन खारेपाटण ज्युनियर कॉलेज वाढीव प्रवेश प्रक्रियेस मंजुरी मिळावे असे निवेदन दिले होते.अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून खारेपाटण ज्युनियर कॉलेजच्या प्रस्तावाला सन या २०२५- २६ या शैषणिक वर्षांकरिता ११ वी प्रवेश प्रक्रियेस सुमारे १२० विद्यार्थ्यांची मंजुरी मिळाली आहे.
याबाबत नुकताच सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांचा खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण ज्युनियर कॉलेजच्या वतीने संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्राचार्य संजय सानप,पर्यवेक्षक संतोष राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण येथील ज्युनियर कॉलेज मध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली,वैभववाडी व देवगड तालुक्यातील ग्रामीण भागतील गावामधून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असून या शासनाच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे इच्छा असून देखील खारेपाटण कॉलेज मध्ये प्रवेश घेत येत नव्हता.मात्र श्री मंगेश गुरव या कॉलेजची ११ वी प्रवेश मर्यादा वाढवून मिळण्याची मागणी केल्यामुळे व सदर मागणीला तातडीने मंजुरी मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.तर खारेपाटण ज्युनियर कॉलेजला आता १२० विद्यार्थी प्रवेश मर्यादा पटसंख्येला मंजुरी मिळाली असल्याने प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्याचा प्रवेशाचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे.











