सांगवे, भिरवंडे ग्रामदैवत दिर्बादेवी मंदिरासाठी संदेश सावंत, संजना सावंत यांच्याकडून 5 लाखाची देणगी

कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे भिरवंडे गावची ग्रामदेवता श्री दिर्बादेवी मंदिर येथे घटस्थापना व दसरा उत्सव च्या औचित्याने माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत व संजना सावंत यांनी पाच लाख रुपये ची देणगी श्री दीर्बादेवी मंदिरसाठी जाहीर केली. तसेच अडीच लाख रुपये चा पहिला हप्ता देवस्थान च्या मानकऱ्यांकडे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुपूर्द केला.यावेळी प्रदीप उर्फ बाली सावंत, भालचंद्र सावंत, महेश सावंत, यतीन सावंत, रामकृष्ण सावंत राजेंद्र उर्फ बाळा सावंत, विलास सावंत संतोष सावंत, भरत गावकर, चंदू गुरव, बाळकृष्ण पुजारे सिद्धार्थ कांबळे विश्वनाथ कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते संदेश सावंत उभायतांच्या दातृत्वा बद्धल दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत.

error: Content is protected !!