मंगेश लोके यांची शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते लोके उद्या करणार भाजपात पक्षप्रवेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके हे भारतीय जनता पार्टी पक्षात शनिवारी प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना उबाठा  पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. तर नवीन तालुका प्रमुख म्हूणन उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे यांची निवड पक्षाकडून करण्यात आली आहे.

उबाठा तालुकाप्रमुख मंगेश लोक हे भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह शनिवारी प्रवेश करण्याची शक्यता आहे.
लोके यांच्या प्रवेशामुळे वैभववाडी तालुक्यात उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष मजबूज स्थिती असून उबाठा शिवसेनेचे बरेच कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपात सामील होतं आहेत.

लवकरच जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकी होणार असल्यामुळे पक्षीय राजकारणाला रंग आला आहे.  भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाव गाव पिंजून काढून पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षाला विरोधकच नसल्याचे दिसून येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर माजी पंचायत समिती सदस्य आणि विद्यमान शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याने त्यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे. तर तालुका प्रमुख म्हणून उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

मंगेश लोके यांचा प्रवेश जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालय ओरस येथे होणार असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजले.

error: Content is protected !!