वैभववाडी (प्रतिनिधी) : कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा टाटा इंट्रो टेम्पो वैभवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री तीन पन्नास वाजण्याच्या दरम्यान बावडा हेत फाटा येथे करण्यात आली. याप्रकरणी लेझर पीटर डिसोझा वय 27 व समीर मधुकर सावंत वय 36 दोघेही राहणार भडगाव ता. कुडाळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभववाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खारेपाटण गगनबावडा मार्गावर भुईबावडा हेत फाटा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास जाधव, हरीश जायभाय, अजित पडवळ यांनी अगोदरच सापाला रचला होता. मध्यरात्री ३. ५० च्या सुमारास खारेपाटणकडून गगनबावड्याच्या दिशेने जाणारा टाटा कंपनीचा टेम्पो क्र. एम एच 07आज 4312 हा पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता या टेम्पोतून तीन बैल व तीन गाई टेम्पोच्या हौदयात दाटी वटीने कोंबून त्यांची चारा पाण्याची सोय न करता बेकायदेशीरपणे विनपरवाना वाहतूक करतांना आढळून आले. याप्रकारणी दोन्हीही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन बैल प्रत्येकी 10 हजार रुपये व तीन गाई प्रत्येकी 10 रुपये असा 60 हजार रुपये व सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा सुमारे 3 लाख 60 हजार रुपयेचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा टेम्पो वैभववाडी पोलिसांनी पकडला…












