कलमठमध्ये भव्य नरकासूर स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ बाजारपेठ येथे संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भव्य नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. यात प्रथम बक्षीस ₹४००० व सन्मानचिन्ह, द्वितीय बक्षीस ₹३००० व सन्मानचिन्ह, तृतीय बक्षीस ₹२००० व सन्मानचिन्ह, तसेच उत्तेजनार्थ ₹१००० व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी इच्छुकांनी नावनोंदणी तेजस लोकरे यांच्याकडे करावी. आयोजक मंडळाचे अध्यक्ष तेजस लोकरे व नितीन पवार यांनी सर्व कलमठ व परिसरातील युवकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!