देवगड (प्रतिनिधी): देवगड पवनचक्की येथे राहणा-या सुमित गणपत जुवाटकर, वय 33 वर्षे, याला मोबाईल वरुन ऑनलाइ्रन व्यवहार करुन स्कुटी विक्री करण्याच्या बहाण्याने रक्कम 1,20,040/- रुपये (अक्षरी-एक लाख वीस हजार चाळीस रुपये) एवढ्या रकमेची मोबाईल मधील गुगल पे व फोन पे या ऍप्स द्वारे पाठविण्यास सांगून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड पवनचक्की येथे राहणा-या सुमित गणपत जुवाटकर, वय 33 वर्षे, याला स्कुटी विक्री करण्याच्या बहाण्याने दि.10/02/2023 रोजी 22.00 ते दिनांक 11/02/2023 रोजी 14.30 वाजता मोबाईल वरून ऑनलाईन व्यवहार करुन रक्कम 1,20,040/- रुपये (अक्षरी-एक लाख वीस हजार चाळीस रुपये) एवढ्या रकमेची मोबाईल मधील गुगल पे व फोन पे या ऍप्स द्वारे पाठविण्यास सांगून फसवणूक केल्याची तक्रार तक्रारदार सुमीत जुवाटकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी दाखल केल्याची माहिती पोलीस पोलीस निरिक्षक निळकंठ बगळे यांनी दिली आहे. सदर व्यक्तीवरती देवगड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.59/2023 भा.द. वि. कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान (सुधारणा)अधिनियम 2008 चे कलम 66(c), 66(d) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.