खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच गावातील जि. प. प्राथमिक मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांची तसेच खाजगी संस्था संचलित माध्यमिक शाळांची एकत्रित शैशणिक ग्रामसभा सरपंच प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, किरण कर्ले, मनाली होणाळे,क्षितिजा धुमाळे, दक्षता सुतार, अस्ताली पवार, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदकिशोर कोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, मंगेश ब्रम्हदंडे, खारेपाटण जि. प. केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, खारेपाटण हायस्कूलचे पर्यवेशक संतोष राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी सरपंच प्राची ईसवलकर यांनी उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक प्रतिनिधी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, समिती सदस्य यांचे स्वागत केले. शैशणिक सभेचा उद्देश उपस्थिताना सांगितला. यावेळी गावातील शाळांच्या सद्य परिस्थित बाबत तसेच विद्यार्थी गुणवत्ता व भौतिक सोयी सुविधा या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सर्व शाळांच्या शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सहभाग घेतला. व आप आपल्या शाळेतील विविध समस्या शैक्षणिक ग्रामसभेत मांडल्या.
यावेळी खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तदन्य पत्रकार संतोष पाटणकर यांनी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या शैक्षणिक ग्रामसभेला मार्गदर्शन केले. तर खारेपाटण हायस्कूलचे पर्यवेशक संतोष राऊत,खारेपाटण संभाजीनगर टाकेवाडी जि.प.शाळेचे शिक्षक राजेश तेरवणकर, रामेश्वर नगर जि.प.शाळेचे शिक्षक धुळप, हसोळ टेंब कोंडवाडी जि.प.शाळेच्या शिक्षिका शिवलीला निडसोसी, काझीवाडी जि. प. उर्दू शाळा शिक्षक इरफान सारंग, बंदरवाडी जि.प. उर्दू शाळेच्या शिक्षिका नाजमीन मुल्ला आदी शिक्षकांनी या शैशणिक ग्रामसभेत आपले मनोगत व्यक्त केले.
खारेपाटण गावातील सर्वच शाळा शौशणिक गुणवत्ते मध्ये चांगल्या असून ग्रामपंचायत स्तरावर सर्व शाळाना आवश्यक असणाऱ्या भौतिक सोयी सुविधा ग्रामपंचायत विकास आराखडयात तरतूद करून पुरविल्या जातील मात्र जास्तीत जास्त सुविधा या लोकसहभागातून निर्माण कराव्यात असे प्रतिपादन यावेळी सरपंच प्राची ईसवलकर यांनी विशेष ग्रामसभेत शिक्षकाना मार्गदर्शन करताना केले. या संपूर्ण सभेचे सूत्रसंचलन व आभार खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी विशाल वरवडेकर यांनी केले.












