आडाळी येथे कारची धडक; नूतन विद्यालयाचा विद्यार्थी गंभीर जखमी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : आडाळी येथे रस्ता ओलांडताना कारची धडक बसल्याने नूतन विद्यालय, कळणेचा विद्यार्थी मयूर मनोज शेळके (वय १४) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-आजिलो येथे हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर हा आज सकाळी शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर एसटी बसची वाट बघत उभा होता. बस आल्यावर ती पकडण्यासाठी तो रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या टाटा एस (छोटा हत्ती) वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत त्याचे डोके वाहनाच्या दर्शनी भागावर आदळले व तो रस्त्यावर फेकला गेला.

अपघातानंतर उपस्थितांनी तत्काळ मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून मयूरला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

error: Content is protected !!