सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा वैभववाडीत महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध

वैभववाडी (प्रतिनिधी) : लोकशाहीचा तिसरा मुख्य स्तंभ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. भूषण गवई यांच्यावर सोमवारी भर न्यायालयात चप्पल फेक करणाऱ्या ॲड. शर्मा नावाच्या व्यक्तीचा तीव्र निषेध आज वैभववाडीत महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला. डॉ.बाळासाहेब आंबेडकर भवन येथे शिवसैनिकांनी घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. लोकशाहीचा तिसरा मुख्य स्तंभ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या वर सोमवारी एक न्यायालयीन खटला सुरू असताना ॲड. शर्मा यांनी बूट फेकण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. या विकृत वकिलाची सनद कायमस्वरूपी रद्द करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केली. आज संपूर्ण देशातल वातावरण धर्मांनी सामाजिक विषमता निर्माण करणार दिसत आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध होत असताना सत्ताधारी मात्र या बाबतीत चकार शब्द न काढता मुळ गिळुन बसुन प्रतिक्रिया देत नाहीत ही फारच गंभीर बाब असल्याचे सतीश सावंत म्हणाले. सुशांत नाईक म्हणाले आज वैभववाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महाविकास आघाडीच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहोत. खर म्हणजे ही प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत चालली आहे ती प्रवृत्ती ह्या ठिकाणी आताच ठेचली पाहिजे. खरं तर हा बाबासाहेबांच्या संविधानावर झालेला हल्ला आहे.

तालुकाप्रमुख नंदू शिंदे, माजी पं. सभापती लक्ष्मण रावराणे, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, तालुका सचिव गुलझार काझी, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख जावेद पाटणकर, कोळपे विभागप्रमुख जितेंद्र तळेकर, कोकिसरे विभागप्रमुख यशवंत गवाणकर, लोरे विभागप्रमुख सूर्यकांत परब, महिला तालुकाप्रमुख नलिनी पाटील, महिला तालुका संघटक दिव्या पाचकुडे, नगरसेवक बंधू सावंत, लोरे उपविभागप्रमुख स्वप्नील रावराणे, कोकिसरे उपविभागप्रमुख राजेश तावडे, नारायण दळवी, ॲड. अजितसिंह काळे, डॉ. आर. बी. जाधव, ओमकार इस्वलकर, करीम इसफ, वसंत खानविलकर, जनार्दन विचारे, सुरेश पांचाळ, श्रीराम शिंदे, दीपक चव्हाण, आनंद नांदोस्कर, अमित कुडतरकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!