कणकवली (प्रतिनिधी) : देवगड अर्बन बँकेच्या संचालकपदी फोंडाघाट येथील भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा सहकार क्षेत्रातील अनुभवी असलेले राजन चिके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. देवगड अर्बन बँकेच्या रिक्त संचालकपदाच्या नियुक्तीसाठी देवगड अर्बन बँकेच्या देवगड येथील प्रधान कार्यालयात आज निवड कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा उपनिबंधक श्री. परब यांच्या निरीक्षकतेखाली संपन्न झालेल्या संचालकपदासाठी झालेल्या निवडणूकीसाठी राजन चिके यांचे एकमेव नामनिर्देशन दाखल झाले होते. त्यामुळे राजन चिके यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. संचालकपदी बिनविरोध निवड होताच नूतन संचालक चिके यांचे जिल्हा उपनिबंधक श्री. परब, बँक चेअरमन सदाशिव ओगले, व्हाईस चेअरमन अभय बापट तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
राजन चिके यांची देवगड अर्बन बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड










