खारेपाटण येथे राष्ट्रीय पोषण महासप्ताह संपन्न

अंगणवाडी केंद्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन

“सुदृढ बालकांची वृद्धी म्हणजेच कुपोषणातून मुक्ती” – प्रदीप श्रावणकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : “आजची बालके ही उद्याच्या राष्ट्राची संपत्ती असून त्यांची नीट जोपासना करणे अर्थात त्यांना योग्य व सकस आहार देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून “सुदृढ बालकांची वृद्धी म्हणजेच कुपोषणातून मुक्ती” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी राष्ट्रीय पोषण महा सप्ताह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प कणकवली यांच्या वतीने खारेपाटण गावातील अंगणवाडी केंद्राचे मिळून जि.प.केंद्र शाळा नं.१ येथील अंगणवाडी केंद्रात नुकतेच राष्ट्रीय पोषण महाअभियाना अंतर्गत राष्ट्रीय पोषण महा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घघाटन बाल विकास प्रकल्प अधिकारी उमा हळदेणवेकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तर या कार्यक्रमाला खारेपाटण बीटच्या मुख्य सेविका नीना कडुलकर, खारेपाटण ग्रा.पं.सदस्य अस्ताली पवार, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, खारेपाटण प्रा.आ.उप केंद्राच्या आरोग्य समुदाय अधिकारी स्नेहा जाधव, आरोग्य सेवक मिथुन गेडाम, बंदरवाडी जि.प.उर्दू शाळेच्या शिक्षिका नाजमीन मुल्ला आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित सर्वं मान्यवरांचे अंगणवाडी सेविकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खारेपाटण गावातील अंगणवाडी ताईने सामूहिक कुपोषण मुक्तीचे गीत सादर करून बालकांना सकस आहार देण्याचा संदेश दिला.

यावेळी मुख्य सेविका श्रीम. कडुलकर यांनी राष्ट्रीय पोषण महा अभियानाची गरज व त्याचे फायदे तसेच मातांनी आपल्या बालकांची कधी काळजी घ्यावी याबाबत सखोल असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी श्रीम. हळदणवेकर व ग्रा.पं.सदस्य अस्ताली पवार यांनी शुभेछा दिल्या. यावेळी खारेपाटण केंद्रशाला नं.१ या अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस निकिता गुरव यांच्या वतीने गरोदर मातांचे पुष्प वर्षाव करून स्वागत व खना नारळाने ओटी भरण्याचा सन्मानपूर्वक कार्यक्रम यावेळी पार पडण्यात आला.यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पाककला कृती मध्ये विविध पौष्टिक व जीवनसत्त्व युक्त छान पदार्थांची मांडणी करण्यात आली होती.मान्यवरांनी या पदार्थांची पाहणी करत प्रत्यक्ष चव घेतली. या कार्यक्रमाला खारेपाटण मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच माता पालक,स्तनाद व गर्भवती माता आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अंगणवाडी सेविका सविता पाटणकर यांनी केले. तर आभार अंगणवाडी सेविका श्रीम. कापसे यांनी मानले.

error: Content is protected !!