घोणसरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच प्रसाद राणे यांच्या हस्ते ‘आपले सरकार सेवा’ केंद्राचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत घोणसरी येथे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांना सर्व सेवा व दाखले सुलभरित्या मिळण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. या सेवा केंद्राचे उद्घाटन घोणसरी सरपंच प्रसाद दिलीप राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सेवा केंद्राच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात गावातील सर्व जि.प.शाळा व हायस्कूल च्या सुमारे 160 विद्यार्थ्यांचे वय अधिवास व जात प्रमाणपत्र काढण्यात येणार आहेत. या सोबतच ग्रामस्थांना शासनाच्या विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच ग्रामस्थांचा वेळ, व खर्च वाचवून शासनाच्या सेवा थेट त्यांच्या दारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आपले सरकार केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच प्रसाद राणे, ग्रामपंचायत सदस्य अंकिता परब, सतिश जाधव, प्राची राणे, दिप्ती कारेकर, सुप्रिया आचरेकर, ऐश्वर्या सावंत, महेश येंडे, सचिन सुतार, ग्रामस्थ अनंत गुरव, विश्वजित रावराणे, दत्ताराम गुरव, मिहिर मराठे, विलास मराठे, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश गोसावी, केंद्र चालक वॅलेरियन पिंटो, सहा.कृषी अधिकारी श्रीम. कानडे व ग्रा.प.कर्मचारी आदी उपस्थित होते. या केंद्राच्या माध्यमातून उत्पन्न दाखला, वय अधिवास दाखला ,वयराष्ट्रीयत्व दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड नाव कमी व रेशन कार्ड नाव दाखल करणे यासह सर्व प्रकारचे सरकारी दाखले, ऑनलाईन ७/१२ व ८ अ उतारा,सर्व प्रकारचे ऑनलाईन सेवा व दाखले इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

error: Content is protected !!