आमदार निलेश राणेंसोबत माजी आमदार राजन तेली यांची सिंधुदुर्गात दमदार एन्ट्री

माजी आमदार राजन तेली यांचे शिवसेना सिंधुदुर्गात करणार जंगी स्वागत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले राजन तेली यांची शिवसेना पक्षप्रवेशानंतर आमदार निलेश राणेंसोंबत 10 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात दमदार एन्ट्री होणार आहे. माजी आमदार राजन तेली यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. उबाठा सेनेतून राजन तेली यांनी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर प्रथमच तेली यांचे सिंधुदुर्गात आगमन होत आहे. माजी आमदार राजन तेली यांचे 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता खामदेव नाका बांदा येथे शिवसेनेकडून जंगी स्वागत करण्यात येईल. सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी आमदार निलेश राणे यांच्या कुडाळ येथील संपर्क कार्यालयात स्वागत होईल.त्यानंतर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी कणकवली शिवसेना कार्यालय येथे माजी आमदार तेली भेट देणार असून त्यांचे कणकवलीत जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!